
Home
About VMSS
About MMD
Dubai Overview
Programs on
4th March 2010
5th March 2010
6th March 2010
Venue
Registration
Accommodation
Visa/Ticketing
Media Centre
Photo Gallery
Sponsors
|
मायमराठीचा कीर्तिमान सातासमुद्रापार प्रस्थापित करणारे विश्व मराठी साहित्य संमेलन यंदा दुबईत भरतंय.
दुबई जागतिक स्तरावरच्या महत्वाच्या व्यापारी केंद्रांमधील एक शहर मानले जाते. आणि अशा या दुबई शहरात मराठी साहित्य संमेलनाचा यशोध्वज फडकविण्याचा बहुमान दुबई महाराष्ट्र मंडळाने पटकावलाय !
दुबई महाराष्ट्र मंडळ आणि महाराष्ट्र साहित्य महामंडळातर्फे दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या चार, पांच आणि सहा मार्च रोजी दुबईत केलं आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक श्रीयुत मंगेश पाडगावकर भूषविणार आहेत.
कविता, गीत, गझल आणि इतर अनेक साहित्य प्रांतांत पाडगावकरांनी हुकमी मुशाफरी केलेली आहे. ज्येष्ठ कविवर्य विंदा करंदीकर आणि कविवर्य वसंत बापट यांच्याबरोबर पाडगावकरांनी महाराष्ट्रभर काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. करंदीकर, बापट आणि पाडगावकर त्रयीने माराठी कविता मनामनात रुजवली. भावकविता, भक्तिगीत, गझल, उपहासात्मक कविता, बंडखोर कविता, निसर्गकविता, निबंधात्मक लेखन अश्या अनेक साहित्य प्रकारांमधून आपल्या प्रतिभेची सुस्पष्ट छाप मराठी मनावर पडणाऱ्या पाडगावकरांची जीवनासक्ती त्यांच्या कवितेतून उत्कटतेने प्रकट होताना दिसते.
'सलाम' या आपल्या बंडखोर कवितेमधून पाडगावकरांनी उदासीन झलेली मराठी संवेदना जागृत केली. या संग्रहासाठी त्यांना १९८० साली साहित्य अकादमी चा पुरस्कार देउन गौरविण्यात आले. याशिवाय 'धारानृत्य', 'शर्मिष्ठा', 'उत्सव', 'मीरा, 'उदासबोध' , 'नवा दिवस' असे अनेक काव्यसंग्रह देउन त्यांनी मराठी श्रीमंत केली. वयाची ८० वर्षे ओलांडलेले ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भूषण आहेत! त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने त्यांना २००८ साली 'महाराष्ट्र भूषण' हा पुरस्कार देउन गौरविले आहे. असे सुविद्य आणि ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्ष म्हणून लाभले हे दुबई महाराष्ट्र मंडळाचे भाग्याच आहे!
विश्व मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात मागच्याच वर्षी अमेरिकेत झाली. अमेरिकेतल्या बे एरिया महाराष्ट्र मंडळाने १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान पहिल्या विश्व संमेलनाचे आयोजन मिलीपितास कॅलिफोर्निया येथे केले होते. तसा साहित्य संमेलनाचा इतिहास जुना आहे. महाराष्ट्रात पहिले साहित्य संमेलन न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली १८७८ साली पुण्यात भरले होते. पुणे ते दुबई असा साहित्य संमेलनाचा हा प्रवास देखणा आणि नक्कीच कौतुकास्पद आहे!
|

संमेलनाचे
अध्यक्षपद
ज्येष्ठ कवी आणि
साहित्यिक श्रीयुत
मंगेश पाडगावकर
भूषविणार

विश्व साहित्य
संमेलनः
स्वागताध्यक्षपदी
धनंजय दातार
आग्रहाचे निमंत्रण...
विश्व साहित्य संमेलनाचे!
संजीवनी सुजय पाटील,
अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ,
दुबई
|