Welcome to Maharahstra Mandal Dubai

१९७३ साली पाच- सहा मराठी प्रेमींनी एकत्र येऊन दुबईच्या या वाळवंटात एक इवलेसे रोप लावले. काळजीपूर्वक त्याचे संगोपन केले. त्याचे आज ४० वर्षानंतर महाराष्ट्र मंडळ, दुबई या डेरेदार वृक्षात रुपांतर झाले. दरवर्षी नवा अध्यक्ष, नवी कार्यकारणी या वृक्षाचे खत-पाणी घालून अपापल्या पद्धतीने संवर्धन करते.आणि दरवर्षी नव्या सभासदांच्या रूपाने नव्या पारंब्या या वृक्षाला लाभत असतात.या वटवृक्षाच्या छायेत सगळे आनंदाने आणि प्रेमाने गेली ४० वर्षे नांदत आहेत, या वृक्षाच्या छायेत सर्वाना माहेरी असल्यासारखे वाटते म्हणूनच याला परदेशातील माहेरघर म्हटले जाऊ लागले.

Read More